नागपूर- उपराजधानीत सूर्य आग ओकत असून गेल्या आठवडाभरात शहरातील विविध ठिकाणी उष्माघाताच्या बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात विविध ठिकाणी ५ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. विदर्भातील तापमानानने उच्चांक गाठला असून लोकांचे घराबाहेर पडणेही मुश्किल होऊन बसले आहे.
सूर्य कोपला.! नागपुरात उष्माघाताचे आठवड्यात २५ बळी, तर गेल्या २४ तासात ५ जण दगावले - sun stroke nagpur
उपराजधानीत सूर्य आग ओकत असून गेल्या आठवडाभरात शहरातील विविध ठिकाणी उष्माघाताच्या बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत ४० वर्षीय सुब्रमण्यम नायडू तर इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. गणेशपेठ, अजनी आणि जारीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत देखील उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा एकूण ५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
विदर्भात यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाचा कडाका वाढला. एप्रिल महिन्याअखेरीस तर तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अती तापमानाने त्रास होऊन उष्माघाताच्या बळींना सुरुवात झाली. गेल्या आठवडाभरात २५ अनोळखी लोकांचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत.