महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणाचा नागपुरात निर्घृण खून, मृतदेह दुचाकीला बांधून विहिरीत फेकला - हिंगणा पोलीस

नागपुरातील हिंगणा तालुक्यातील सुकळी शिवारात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी धीरज नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

death banti chidam
मृत बंटी चिडाम

By

Published : Oct 7, 2020, 7:18 PM IST

नागपूर - येथे एका 24 वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली. शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील सुकळी गुपचूप शिवारात ही घटना घडली. बंटी शामराव चिडाम असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी धीरज नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

आरोपीने बंटीचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेह दुचाकीला बांधून मृतदेह फरफटत नेला. यानंतर आरोपीने बंटीचा मृतदेह आणि दुचाकी शेतातील विहिरीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेला एकतर्फी प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

मृत बंटीचा चुलत भाई मेघराज याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार काल (मंगळवारी) दुपारी बंटी सोबत त्याची भेट झाली होती. त्यानंतर बंटी कुणालाही दिसून आला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला. यावेळी गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीजवळ एका खांबावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्याचठिकाणी असलेल्या विहिरीकडे कुणाला तरी ओढत नेल्याच्या खुणा जमिनीवर दिसून आल्या. आज (बुधवारी) सकाळपासुनच विहिरीच्या आत शोध घेतला जात होता.

स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने गळ पाण्यात टाकून काही सापडते काय? याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गळाला बंटीचा मृतदेह आणि दुचाकी लागली आहे. बंटीचा खून कुणी आणि का केला असावा? यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्याच्या आधारे पोलिसांनी गावातील धीरज नावाच्या एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेदेखील पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी धीरज नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details