महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 14, 2020, 9:37 PM IST

ETV Bharat / state

Corona virus : नागपुरात 23 नव्या रुग्णांची भर, 58 जणांची कोरोनावर मात

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नाईक तलाव-बांगलादेश, जुनी मंगळवारी, डोबीनगर, सतरंजीपुरा येथील संशयित नागरिकांचा समावेश आहे. तर 58 रुग्ण कोरोना मुक्त देखील झाले आहेत.

Nagpur hospital
Nagpur hospital

नागपूर- नागपूरात आज दिवसभरात 23 करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 992 झाली आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने प्रशासनाने त्यांचे विलगीकरण केले होते.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नाईक तलाव-बांगलादेश, जुनी मंगळवारी, डोबीनगर, सतरंजीपुरा येथील संशयित नागरिकांचा समावेश आहे. तर 58 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत, त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 629 इतकी झाली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा हा सर्वाधिक आकडा आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्ण वाढीचा वेग सुसाट असल्याने एकूण कोरोनाबधितांचा आकडा हजारच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. शिवाय 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे. आज शहरातील आसीनगर झोन परिसरातील बाबा बुढाजी नगर, टेका नाका या परिसरात कोविडबाधित रुग्ण आढळून आल्याने नागपूर महानगरपालिकेने खालील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तर जवाहर नगर आणि ताजनगर परिसर कोरोनामुक्त झाल्याने महानगरपालिकेने या परिसरांना प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून वगळलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details