नागपूर - २०१५ पासून सातत्याने महानगरपालिकेकडे 'आप'ने नागपुरातील शाळांचा स्तर उंचावण्यासाठी निवेदन सादर केले होते. मात्र, त्यावर योग्य अंमलबजावणी होत नव्हती. अखेर 'आप'च्या कार्यकर्त्यांना यासाठी २६ जानेवारीपासून मनपाविरुद्ध आंदोलने व उपोषणाला बसावे लागले. या आंदोलनामुळे मनपाला जाग आली आणि आगामी अर्थसंकल्पात मनपा शाळांना आधुनिक करण्यासाठी शिक्षणावर २०% निधी मंजुर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
'मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात २० टक्के निधी देणार'
नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ६० शाळांना अत्याधुनिक(डिजिटल)करण्यात येणार आहे. सोबतच मनपा विद्यांर्थांना शहरातंर्गत असणाऱ्या 'आपली बस'मध्ये मोफत पासेस व एका विशेष बसला मंजुरी मिळणार आहे.
'आप'चे कार्यकर्ते दीपक साने