महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : निवडणुकीच्या काळात अवैध दारूचा महापूर; १७१ आरोपींना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर-विदर्भातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या अवैध दारूचा व्यवहार वाढत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करायला सुरुवात केली आहे.

राज्य उत्पादन शुल्काची अवैध दारू विक्री विरोधात मोहिम

By

Published : Apr 7, 2019, 12:42 PM IST

नागपूर - आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळताना दिसत आहे. गेल्या २५ दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २२२ गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये १७१ आरोपींना केली, तर ९ वाहने जप्त केली. एकूण कारवाईत २५ लाख ८५ हजार ८८७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याशिवाय आत्तापर्यंत झालेल्या कारवाईत ३ हजार २४३ लीटर हातभट्टीची दारू, ५१ हजार १८० लीटर दारू तयार करण्याचे रसायन नष्ट करण्यात आले. यात ५६२ लीटर देशी दारू, १११ लीटर फॉरेन लिकर यासह ५० लीटर ताडी आणि ५ टन काळा गुळ जप्त करण्यात आला आहे. एकूण ९ गाड्यादेखील करण्यात आले असून या सर्व मुद्दे मालाची किंमत २५ लाख ८५ हजार ८८७ रुपये इतकी आहे यामध्ये १७ लाख २० हजार ८८७ रुपयांच्या अवैध दारूचा देखील समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details