मुंबई- एका २५ वर्षीय विवाहित तरुणाने महाविद्यालयीन विध्यार्थीनीचे बळजबरीने चुंबन घेतल्याचा प्रकार विक्रोळी रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडला. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी वसीम शेख याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून घेतले तरुणीचे चुंबन, आरोपी अटकेत - चुंबन
एका २५ वर्षीय विवाहित तरुणाने महाविद्यालयीन विध्यार्थीनीचे बळजबरीने चुंबन घेतल्याचा प्रकार विक्रोळी रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेख आणि पीडित तरुणी एकाच सोसायटीत राहतात. आरोपी वसीम शेख बऱ्याच दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. काही तरी कारण सांगत जवळीकता वाढवत होता. पीडित तरुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. पीडित तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली होती.
रविवारी दुपारी विक्रोळी रेल्वे स्थानकावर वसीम शेख तरुणीचा पाठलाग करत होता. तरुणी क्लासवरून विक्रोळी स्थानकातील फलाटावर आली असता, वसीम पाठलाग करतो आहे, हे समजण्यापूर्वीच शेखने संबंधित तरुणीचे चुंबन घेतले. हा प्रकार तरुणीने कुटुंबातील सदस्यांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबियांनी पार्क साईट विक्रोळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वसीम शेखला अटक केली.