मुंबई- एका 19 वर्षीय तरुणाने आजारपणाला कंटाळून घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आदित्य अनिल कांबळे, असे तरूणाचे नाव असून आदित्य हा विक्रोळी सुदर्शन टेकडी पार्कसाईट येथे आपल्या कुटुंबासह राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य काही दिवसांपासून एका दुर्दर आजाराने ग्रस्त होता. आजारपणाला कंटाळून त्याने घरात कोणी नसताना रविवारी (दि. 4 ऑक्टोबर) दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. त्याला तत्काळ नजिकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून मृतदेह राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असल्याचे पार्क साईट पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले.
विक्रोळीत आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्महत्या - विक्रोळी बातमी
दुर्दर आजाराला कंटाळून एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
संग्रहीत छायाचित्र