महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून त्याने गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी विकली कार

ऑक्सिजनच्या अभावी मित्राच्या गर्भवती बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तो स्वत:ची महागडी गाडी विकून गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवण्याचे काम करत आहे. शाहनवाज शेख असे त्या तरुणाचे नाव आहे.

young boy provide free oxygen cylinder for patient in mumbai
ऑक्सिजनअभावी मित्राच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू; त्याने गरजू रुग्णांना मोफत सिलिंडर पुरवण्यासाठी विकली कार

By

Published : Jun 25, 2020, 7:01 AM IST

Updated : Jun 25, 2020, 9:40 AM IST

मुंबई- ऑक्सिजनच्या अभावी मित्राच्या गर्भवती बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तो स्वत:ची महागडी गाडी विकून गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवण्याचे काम करत आहे. शाहनवाज शेख असे त्या तरुणाचे नाव आहे.

आपल्या मालकीची व मनासारखी गाडी घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी जो-तो प्रयत्न करत असतो. पण मालाडमधील शाहनवाजची कहाणी काहीशी निराळीच आहे. त्याने स्वत:ची असलेली महागडी गाडी विकली. यातून मिळालेल्या पैशातून त्याने गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवण्याचे काम सुरू केले आहे.

या घटनेमुळे घेतला निर्णय -

शाहनवाज याचा व्यावसायिक पार्टनर आणि मित्र अब्बास याची बहिण 6 महिन्यांची गर्भवती होती. तिला 28 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी तिला रुग्णालयात नेले, मात्र ठाण्यातील 5 रुग्णालयांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला. या दरम्यान तिचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. तेव्हा शाहनवाज याने डॉक्टरांकडे तिच्या मृत्यूचे कारण विचारले असता, त्याला सांगण्यात आले की, ऑक्सिजन सिलेंडर वेळेत लावला असता तर तिचे प्राण वाचले असते. या घटनेने हेलावलेल्या शाहनवाजने गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत उपलब्ध करून उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला.

शाहनवाजने गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी विकली कार...

शाहनवाजने 2011 मध्ये फोर्ड एन्डेव्हर ही महागडी गाडी विकत घेतली होती. यात त्याने आवडती नंबर प्लेट, म्युझिक सिस्टमही बसवून घेतली होती. ती गाडी त्याने विकली. आलेल्या पैशातून त्याने, गरजू रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत उपलब्ध करुन देण्यास सुरूवात केली. आतापर्यंत त्याने 400 गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत.

या कामासाठी त्याला डॉ. सबाउद्दिन शेख हे मदत करत आहेत. ज्या गरजू रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे त्याने, डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणून दिल्यास, त्याला शाहनवाज सिलिंडर पुरवतो. महत्वाचे म्हणजे, काहीं रुग्णांना येणे शक्य नसल्यास त्यांच्यापर्यंत तो ऑक्सिजन सिलिंडर पोहचवण्याची व्यवस्था देखील करतो.

आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक भावनेतून मी हा पुढाकार घेतल्याचे शाहनवाज म्हणाला. मालाड पूर्व, जोगेश्वरी व वांद्रे परिसरातून ऑक्सिजन सिलिंडर हवे असल्याचे, फोन येत असल्याचे त्याने सांगितले.


हेही वाचा -काल-परवाच तुला हळद लागली, आताच पिवळा होऊ नको - अरविंद सावंत यांची पडळकरांवर टीका

हेही वाचा -वांद्रे बस स्टँड येथे समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला अग्निशमन दलाने वाचवले

Last Updated : Jun 25, 2020, 9:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details