मुंबई -मुंबईत येऊन बाॅलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाण्याची स्वप्ने पाहण्याचे उद्योग करण्यापेक्षा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था सुधारावी, अशी खोचक टीका मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
'मुंबईत येऊन उद्योग करण्यापेक्षा योगींनी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था सुधारावी' - mumbai latest news
योगी आदित्यनाथ हे उद्या मुंबईत येऊन येथील बाॅलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित लोकांशी तसेच उद्योगपतींची भेट घेणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण सूरू आहे.
योगी आदित्यनाथ हे उद्या मुंबईत येऊन येथील बाॅलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित लोकांशी तसेच उद्योगपतींची भेट घेणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण सूरू आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून मुंबईंचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. असे प्रयत्न यापूर्वीही करण्यात आलेले आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे योगींनी आधी आपल्या उत्तर प्रदेशमध्ये भोजपूरी चित्रपटांना सोयी सुविधा द्यावी, अशी टीका अस्लम शेख यांनी केली आहे. मुंबई हे सर्व जाती धर्माच्या आणि प्रांतांच्या लोकांना सामावून घेणारे शहर आहे. त्यामुळेच उद्योग व्यवसाय येथे बहरले आहेत. असे भयमुक्त वातावरण उत्तर प्रदेशमध्ये नाही. तेथे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे आधी उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राप्रमाणे भयमुक्त वातावरण तयार करा, नंतर येथील उद्योगधंदे व बाॅलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला नेण्याची स्वप्न पहा, असा टोलाही अस्लम शेख यांनी लगावला.