महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येस बँक प्रकरण : मुंबईसह दिल्लीतही सीबीआयची पुन्हा छापेमारी... - सीबीआयची छापेमारी मुंबई

ज्या वेळी येस बँक राणा कपूर यांनी सोडली होती. तेव्हा बँकेचे बुडीत कर्ज (एनपीए) केवळ 1 टक्का होते. यानंतर बँकेच्या पदावरुन पायउतार झाल्यानंतर 20 हजार कोटींच्या एनपीएशी राणा कपूर यांचे देणे घेणे नाही. येस बँकेच्या संदर्भात सीबीआयने 7 मार्चला गुन्हा नोंदवला आहे.

yes-bank-cbi-raid-again-in-mumbai-and-delhi
yes-bank-cbi-raid-again-in-mumbai-and-delhi

By

Published : Mar 13, 2020, 6:48 PM IST

मुंबई- येस बँक प्रकरणी ईडीकडून राणा कपूर यांची चौकशी केली जात असताना सीबीआयकडून काही दिवसांपूर्वी मुंबईतील 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा आज (शुक्रवारी) मुंबईसह दिल्लीत सुद्धा काही ठिकाणी सीबीआयने धाड छापा टाकला आहे. सीबीआयने येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी राणा कपूर 16 मार्च पर्यंत ईडी कोठडीत असून सीबीआयकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

दरम्यान, 11 मार्च रोजी ईडीच्या वकिलांनी ईडी न्यायालयात येस बँकेच्या घोटाळ्यात तब्बल 30 हजार कोटींचे कर्ज देण्यात आल्याचे सांगितले. या 30 हजार कोटींमध्ये 20 हजार कोटी हे बँकेच्या बुडीत कर्जात (एनपीए) गेले. राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 78 कंपन्यांना हे 20 हजार कोटी दिले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या बरोबरच उरलेले 10 हजार कोटी रुपये कुठे आहेत? याचाही तपास ईडी सध्या करीत आहे.

ज्या वेळी येस बँक राणा कपूर यांनी सोडली होती. तेव्हा बँकेचे बुडीत कर्ज (एनपीए) केवळ 1 टक्का होते. यानंतर बँकेच्या पदावरुन पायउतार झाल्यानंतर 20 हजार कोटींच्या एनपीएशी राणा कपूर यांचे देणे घेणे नाही. येस बँकेच्या संदर्भात सीबीआयने 7 मार्चला गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणात कोणालातरी जबाबदार धरले जाणार आहे, असे म्हटल्याने 6 मार्च रोजी ईडीने रेड केली होती, असे राणा कपूर यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details