महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार'

हिंगणघाट येथील घटनेनंतर औरंगाबाद मिरा रोड याठिकाणी देखील तशाच प्रकारची घटना घडली. याबाबत सरकार गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करेल. सरकार महिला सुरक्षेसाठी अधिक प्रयत्न करणार आहे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

yashomati-thakur
yashomati-thakur

By

Published : Feb 5, 2020, 2:31 PM IST

मुंबई-हिंगणघाट प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जाईल. यामधील आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे बालकल्याण आणि महिला विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

मंत्री यशोमती ठाकूर

हेही वाचा-हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

हिंगणघाट येथील घटनेनंतर औरंगाबाद मिरा रोड याठिकाणी देखील तशाच प्रकारची घटना घडली. याबाबत सरकार गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करेल. सरकार महिला सुरक्षेसाठी अधिक प्रयत्न करणार आहे. औरंगाबाद, हिंगणघाट घटनेबाबत आजच्या कॅबीनेट बैठकीत ठोस निर्णय घेतला जाईल. तसेच दामिनी पथकाला अधिक बळकटी देण्यासाठी चर्चा केली जाईल, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details