महाराष्ट्र

maharashtra

मुंबई मेट्रो-3 मधील 33 वे ब्रेक थ्रू ही मार्गी, 88 टक्के भुयारीकरण पूर्ण

By

Published : Oct 16, 2020, 8:16 PM IST

मुंबई मेट्रो 3 चे आज 33 वे ब्रेक थ्रू पूर्ण करण्यात आले आहे. आता 8 ब्रेक थ्रू पूर्ण झाले की 100 टक्के भुयारीकरण पूर्ण होईल. आज चर्चगेट ते हुतात्मा चौक स्थानकादरम्यानचे भुयारीकरण पूर्ण झाले असून हे अंतर ६५३ मीटरचे आहे. या भुयारीकरणादरम्यान एकूण 502 रिंग्जचा वापर करण्यात आला आहे.

33 वे ब्रेक थ्रू ही मार्गी 88 टक्के भुयारीकरण पूर्ण
33 वे ब्रेक थ्रू ही मार्गी 88 टक्के भुयारीकरण पूर्ण

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 मधील 33 वे ब्रेक थ्रूही आता यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. चर्चगेट ते हुतात्मा चौक येथील मेट्रो स्थानकादरम्यानचे भुयारीकरण या 33 व्या ब्रेक थ्रूच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. तर, आतापर्यंत एकूण 88 टक्के भुयारीकरण पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून देण्यात आलेली आहे.

17 टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) मुंबईच्या पोटात सोडून भुयारीकरण करण्यात येत आहे. 33.5 किमीच्या मेट्रो मार्गात 54 किमी (येणारी मार्गिका-जाणारी मार्गिका) चे भुयारीकरण करण्यात येणार आहे. तर, यासाठी 41 ब्रेक थ्रू करण्यात येणार आहेत. म्हणजेच टीबीएम मशीन भुयारीकरणाचे काम पूर्ण करून बाहेर पडणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत 41 पैकी 32 ब्रेक थ्रू पूर्ण झाले आहेत. तर, आज 33 वे ब्रेक थ्रू पूर्ण करण्यात आले आहे. आता 8 ब्रेक थ्रू पूर्ण झाले कि 100 टक्के भुयारीकरण पूर्ण होईल. आज चर्चगेट ते हुतात्मा चौक स्थानकादरम्यानचे भुयारीकरण पूर्ण झाले असून हे अंतर ६५३ मीटरचे आहे. तर, भुयारीकरणादरम्यान एकूण 502 रिंग्जचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या 275 दिवसात डाऊन लाईन मार्गाचे भुयारीकरण एनएटीएम (NATM) बोगद्यात पूर्ण करण्यात आले. एनएटीएम (NATM) बोगद्यात पूर्ण होणारे हे मेट्रो-3 चे पहिलेच भुयारीकरण आहे.

सूर्या-2 या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हा बोगदा खणण्यात आला. या 33 व्या ब्रेक थ्रूचे वैशिष्ट्य म्हणजे फ्लोरा फाऊंटनसह अन्य ऐतिहासिक इमारतीखालून भुयारीकरण करण्यात आले आहे. हे मोठे अवघड आणि आव्हानात्मक काम होते. यासाठी कट ॲन्ड कव्हर आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग या दोन्ही पद्धतीचा संयुक्तिक वापर करून हे अभियांत्रिकी आव्हान पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

आज यशस्वी मार्गी लागलेले 33 वे ब्रेक थ्रू हे पॅकेज 1 मधील आहे. तर या पॅकेज-1 अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत हुतात्मा चौक स्थानकाचे एकूण 53 टक्के काम पूर्ण झाले आहे. पॅकेज-1 मध्ये एकूण 80 टक्के भुयारीकरण आणि 68 टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे.

हेही वाचा -ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून लोकलमध्ये महिलांना प्रवास करू देण्याची मुभा

ABOUT THE AUTHOR

...view details