मुंबई -कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारी-खासगी कार्यालये, सर्व प्रकारचे कामकाज बंद झाले. मग यातून मार्ग काढण्यासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय पुढे आला आणि हा एक ट्रेंड बनला. आज कोरोना नियंत्रणात येत असतानाही वर्क फ्रॉम होमला पसंती मिळत आहे. तर, दुसरीकडे याचा फायदा आता घरविक्रीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला झाला आहे. वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होममुळे 2020 मध्ये ग्राहकांचा मोठी घरे घेण्याकडे कल वाढला आहे.
देशातील 7 आघाडीच्या शहरात होणाऱ्या घरविक्रीनुसार घरांच्या क्षेत्रफळात सरासरी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सर्वाधिक 21 टक्क्यांची वाढ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) झाली असून येथे 773 चौ. फुटावरून 932 चौ. फुटांची घरे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्याचवेळी हैद्राबादमध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या अर्थात 1 हजार 750 चौ. फुटाच्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मालमत्ता बाजारपेठेतील आघाडीच्या अशा अॅनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनीच्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे.
2016 पासून घरांच्या सरासरी क्षेत्रफळात होत होती घसरण
मागील काही वर्षात घरांचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यातही मुंबई, पुण्यासारख्या शहरात घरे महाग झाली आहेत. मुंबईत तर गृहनिर्मितीसाठी जागाच नसल्याने छोट्या घरांची अधिक मागणी आहे. अशावेळी 2016 पासून कमी क्षेत्रफळाची, अर्थात छोट्या घरांची विक्री जास्त होताना दिसत आहे. त्यामुळेच, 2016 आणि 2017 मध्ये दिल्ली, बंगळुरू, एमएमआर (मुंबई-ठाणे-नवी मुंबई-रायगड), पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या 7 शहरात घरांच्या क्षेत्रफळात 13 टक्क्यांनी घट झाली होती. त्यामुळेच 2016 मध्ये 1 हजार 440 चौ. फुटापर्यंतच्या घरांना अधिक मागणी होती. पण, ही मागणी घसरून 2017 मध्ये ती 1 हजार 260 चौ. फुटावर आल्याचे अॅनरॉकने म्हटले. तर 2018 मध्ये आकडा आणखी घसरून 1 हजार 160 चौ. फुटावर आणि 2019 मध्ये 1 हजार 50 चौ. फुटावर आल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
2020 मध्ये मात्र ट्रेंड बदलला
मागील चार वर्षापासून छोट्या क्षेत्रफळांच्या घरांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला होता. घरांच्या वाढत्या किमतीमुळे छोटी घरे अधिक खरेदी केली जातात. पण, आता मात्र 2020 मध्ये यात मोठा बदल झाल्याची माहिती अॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितली. देशातील 7 आघाडीच्या शहरात मोठ्या क्षेत्रफळाची घरविक्री आता होऊ लागली आहे. त्यानुसार 2020 मध्ये देशात घरांच्या क्षेत्रफळात सरासरी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही दिलासादायक बाब असून आता सरासरी क्षेत्रफळ 1 हजार 50 चौ. फुटावरून 1 हजार 150 चौ. फुटावर गेल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम इफेक्ट