महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2020, 3:50 PM IST

ETV Bharat / state

संचारबंदी मोडून टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या महिलेला अटक

अटक केल्यानंतर पोलिसी खाक्या पाहून रेहाना खान या महिलेने तिने केलेला व्हिडिओ हा चुकीचा असून पोलिसांची जाहीर माफी मागितलेली आहे.

rehana khan tick tock
रेहाना खान

मुंबई- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, घराबाहेर दुचाकीवर बसून कोरोना विषाणूला आम्ही घाबरत नाही, आम्ही फक्त आमच्या देवाला घाबरतो, असे म्हणत एका महिलेने टिकटॉकवर व्हिडिओ प्रसारित करत संचारबंदीचे उल्लंघन केले होते. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. रेहाना खान असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे.

रेहाना खानचा टिकटॉक व्हिडिओ

अटक केल्यानंतर पोलिसी खाक्या पाहून रेहाना खान या महिलेने तिने केलेला व्हिडिओ हा चुकीचा असून पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे. पोलीस आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहेत. त्यांचा अनादर करणे चुकीचे आहे, म्हणून मी माफी मागत आहे, असे या महिलेने तिच्या दुसऱ्या टिक टॉक व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, रेहानाने टिक टॉकवर अपलोड केलेला व्हिडिओ डिलिट केला असून पोलिसांनी तिचे टिकटॉक अकाउंट निलंबित केले आहे.

हेही वाचा-संचारबंदीत मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतुकीस परवानगी, अस्लम शेख यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details