महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार करणारी महिला पोलीस ठाण्यात दाखल - women alleged harassment on dhananjay munde NEWS

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केलेली महिला डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. पीडेतेचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.

पोलीस ठाण्यात दाखल
पोलीस ठाण्यात दाखल

By

Published : Jan 14, 2021, 1:19 PM IST

Updated : Jan 14, 2021, 2:12 PM IST

मुंबई -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केलेली महिला डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे वकीलही आहेत. या महिलेचा जबाब सहायक पोलीस आयुक्तांसमोर नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी धनंजय मुंडे विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती.

धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार करणारी महिला पोलीस ठाण्यात दाखल

गुन्हा दाखल करून घेतला नाही तर न्यायालयात जाणार -

आज गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे पीडितेने म्हटले आहे. तर पीडितेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पोलीस उपायुक्त ज्योत्सना रसाळ यांच्यावर आरोप केले आहेत. ज्योत्सना रसाळ या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असून त्यामुळे पीडितेला न्याय मिळणार नाही, असा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. त्यामुळे दुसरा तपास अधिकारी मिळावा, अशी मागणी करणार असल्याचे वकीलांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी पीडितेवर लावलेले खंडणीचे आरोप खोटे असल्याचा दावा वकील त्रिपाठी यांनी केला आहे. सध्या आमच्याकडे असे काही पुरावे आहेत. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते उघड करू शकत नाही, असेही त्रिपाठी यांनी म्हटले.

पीडितेचे वकील

किरीट सोमैय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार -

राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी तक्रार दाखल केली असून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या लग्नाबद्दल व मुलांबद्दल माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

काय आहे प्रकरण -

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा आरोप आहे की, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लोभ धरुन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

या महिलेच्या बहिणीसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना माहित होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत, अशी माहिती मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली.

Last Updated : Jan 14, 2021, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details