महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Cop Molested धार्मीक कार्यक्रमात महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग; पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह तिघांना घेतलं ताब्यात - धार्मीक मिरवणुकीत महिला पोलीस शिपाई

Woman Cop Molested : विक्रोळीतील पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी धार्मीक मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या टवाळखोरांनी महिला पोलिसाचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. यात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश असल्यानं खळबळ उडाली आहे.

Woman Cop Molested
नागरिकांनी पोलीस ठाण्याला घातलेला घेराव

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 10:03 AM IST

मुंबई Woman Cop Molested :धार्मीक कार्यक्रमात पोलीस महिलेचा तीन टवाळखोरांनी विनयभंग केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता पार्क साईट पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन नराधमांना ताब्यात घेतलं आहे. आरोपीत यात विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड

विक्रोळी पार्कसाईट परिसरात महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पीडित महिलेचा विनयभंग करणारा आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. त्याला मदत करणारा दुसरा एक बालक आहे. या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. - पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त मुंबई

पोलीस महिलेचा विनयभंग :विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात धार्मीक मिरवणुकीत महिला पोलीस शिपाई शुक्रवारी कर्तव्य बजावून साध्या गणवेशात घरी जात होती. यावेळी रात्री 11 वाजता पीडित महिला पोलीस शिपायाला दुचाकीवर आलेल्या तीन टवाळखोरांनी छेडलं होतं. यातील एकानं पीडित महिला पोलीस शिपायाच्या पाठीला स्पर्श केला. याप्रकरणी पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पार्क साईट पोलीस ठाण्याला घेराव :धार्मिक मिरवणुकीत पोलीस महिलेचा विनयभंग केल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. याप्रकरणी पीडित महिलेनं पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन भारतीय दंड विधान कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी केलेल्या अटकेच्या दिरंगाईमुळे शनिवारी सकाळी विविध धार्मीक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते पार्क साइट पोलीस ठाण्यासमोर जमले. सूर्यानगर परिसरात अनेक तास दुकानं बंद करण्यात आली. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

रस्ता बंद करण्याची परवानगी का देण्यात आली ? :शुक्रवारी विक्रोळी ते पार्क साईटपर्यंत कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुरू नव्हती. गुरुनानक शाळेच्या आधीही रस्ता बंद करण्यात आला होता. पार्क साइटवरील हजारो रहिवासी मिरवणुकीच्या गर्दीतून स्वतःचं संरक्षण करत चालताना दिसले. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांचा दृष्टीकोन वेगळाच दिसून आला. बंदोबस्तात गुंतलेले पोलीस मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांसमोर हतबल दिसत होते. रात्री बारा वाजेनंतरही डीजेच्या दणदणाटात मिरवणूक सुरूच होती. त्यामुळे विक्रोळी ते पार्कसाईट रस्ता बंद करण्याची परवानगी का देण्यात आली होती, असा सवाल आता विचारला जात आहे.

पोलीस महिलेनं पकडला आरोपी :पार्कसाईट परिसरात धार्मीक मिरवणूक सुरू असताना टवाळखोरांमुळे नागरिकांना मोठा त्रास झाला. महिला पोलीस आपलं कर्तव्य संपवून सुर्यानगरमधील आपल्या नातेवाईकांकडं जात होती. यावेळी या टवाळखोरांनी त्यांची छेडछाड केली. त्यामुळे महिला पोलिसानं त्या नराधमाला पकडलं. मात्र मिरवणुकीतील नागरिकांनी त्याला सोडवून घटनास्थळावरुन पळवून लावलं. धार्मीक मिरवणुकीत महिलेचा विनयभंग झाल्यानं खासदार मनोज कोटक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आरोपीला पकडण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करत शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. छेडणाऱ्या आरोपीला पडकणाऱ्या या पीडित महिलेच्या हिमतीला आपण दाद देत असल्याचं खासदार मनोज कोटक यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं, ते निषेधार्ह असल्याचंही खासदार मनोज कोटक यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा
  2. Threatening Minor Girl: इस्लाम कबुल कर, नाहीतर गोळ्या घालीन; अल्पवयीन मुलीस धमकावले

ABOUT THE AUTHOR

...view details