मुंबई -पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने 15 जानेवारीला केलेल्या कारवाई दरम्यान मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोड परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. या कारवाईदरम्यान अमली पदार्थविरोधी पथकाने नजमा अहमद शेख या (वय 35 वर्षे) महिलेला ताब्यात घेतले होते. तिच्या झडतीमध्ये 10 लाख रुपये किंमतीचे 100 एमडी (मेफेड्रोन) हे अमली पदार्थ आढळून आले.
घरातून 2 किलो चरससह 9 लाखांची रोकड जप्त
नजमा शेख या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तीची चौकशी केली असता ती राहत असलेल्या कुर्ला येथील घरातून पोलिसांनी 2 किलो 700 ग्रॅम वजनाचे चरस जप्त केली असून आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत 54 लाख इतकी आहे. या बरोबरच या महिलेच्या घरातून पोलिसांनी तब्बल 9 लाख 45 हजार रुपयांची रोकडही जप्त केली आहे. अटक करण्यात आलेली महिला गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात एमडी, चरस सारख्या अमली पदार्थांची वाहतूक, विक्री मुंबई व मुंबई उपनगरात करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेला आहे. या महिलेच्या टोळीमध्ये आणखी किती आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा -'गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले'