मुंबई - भाजपने शिवसेनेला राज्यात उपमुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावासह 16 मंत्रीपदे तसेच केंद्रात 1 मंत्रिपद वाढवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रह धरू नये. अन्यथा शिवसेनेविना भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, असे केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे सद्स्य रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच दिलेल्या जागा त्यांनी घ्याव्यात. मुख्यमंत्रिपदावर आग्रह धरू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
'शिवसेनेशिवाय भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी' - union minister ramdas athawale latest news
दररोज शिवसेनेचे संजय राऊत आक्रमक भूमिका घेत काही ना काही भाजपला टोला लगावतात. भाजपने शपथविधी घेऊनच दाखवावा, असे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. त्यावर आठवले यांनी सांगितले की, राऊत यांचे आव्हान असेल तर ते आम्ही स्वीकारतो आणि 2 दिवसात शपथविधी उरकतो. त्यांचे वक्तव्य आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचेही आठवले म्हणाले.
तसेच आठवले यांनी आपल्याला राज्यात एक मंत्रीपद मिळणार आहे, असे देखील सांगितले. तसेच शिवसेना सोबत आली नाही तरी या 2 दिवसात भाजपने मित्रपक्षांना घेऊन शपथविधी उरकावा, असे आवाहनही त्यांनी केले, तर संख्याबळ आणि सत्तास्थापनेचा दावा विधीमंडळात करताना शिवसेना गप्पपणे युतीसोबत येईल, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.