मुंबई - मुस्लीम कट्टरवादी विचारसरणीचे धर्म प्रसारक डॉ. झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. मात्र समाज माध्यमावर अजूनही झाकीर नाईकच्या कट्टरवादी विचारसरणीचा प्रसार होत असून कोट्यवधी फॉलोअर्स असलेल्या या संस्थेच्या फेसबुक खात्यावर बंदी का नाही? असा सवाल हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
झाकीर नाईकच्या फेसबुक अकाउंटवर बंदी का नाही? हिंदू जनजागृती समितीचा सवाल - facebook
समाजात कट्टरवादी विचार पसरवणार्या डॉ. झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर १७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी भारतात केंद्र सरकारकडून बंदी घातली आहे.
नाईकच्या फेसबूक खात्यावर बंदी आणण्यासाठी ५ जून २०१७ या दिवशी केंद्रीय गृहसचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली होती. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना प्रत्यक्ष भेटूनही निवेदन दिले आहे. त्याला दोन वर्षे होत आली आहेत, तरी सरकार अद्याप त्यावर कारवाई का करत नाही, असेही जनजागरण समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याप्रमाणे भारतातही आतंकवादी हल्ले होण्याची शासन वाट पहात आहे का?, असा प्रश्नही शिंदे यांनी सरकारला केला आहे .
समाजात कट्टरवादी विचार पसरवणार्या डॉ. झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर १७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी भारतात केंद्र सरकारकडून बंदी घातली आहे. अंमलबजावणी संचालनालयाला डॉ. नाईकची १९३ कोटी रुपयांची अवैध संपत्ती सापडल्याचे न्यायालयात नुकतेच दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याकडे झाकीर नाईकचे साहित्य सापडल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळे झाकीर नाईक हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे जर सरकारचे म्हणणे आहे, तर त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेच्या फेसबूक खात्यांवर सरकारने आजही बंदी का घातलेली नाही ?फेसबूकसारख्या प्रभावी सोशल मीडियातून जर झाकीर नाईकला प्रचार करू दिला जात असेल, तर त्याच्यावर घातलेली बंदी ही दिखाऊ मानावी लागेल. त्यामुळे नाईकच्या फेसबूकसह अन्य सोशल मीडियाच्या खात्यांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
केंद्रशासनाने बंदी आणल्यानंतर कायद्याप्रमाणे संबंधित संघटनेला प्रसार कार्य येत नाही. असे असताना आजही डॉ. झाकीर नाईकच्या फेसबूक खात्यावर १ कोटी ७० लाख, तर त्यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेच्या फेसबूकवर ६० लाख अनुयायी कार्यरत आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.