महाराष्ट्र

maharashtra

आयुष डॉक्टर याआधीही शस्त्रक्रिया करत होते मग आता विरोध का?

By

Published : Dec 12, 2020, 8:42 AM IST

11 डिसेंबरला देशभरात व्यापक स्वरुपात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतला होता. आयएमएच्या या संपाविरोधात राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी डॉक्टरांनी या संपाचा निषेध नोंदवला आहे.

doctor
डॉक्टर

मुंबई - आयुर्वेद डॉक्टरांना ५८ शस्त्रक्रिया करण्याच्या अधिकारासंदर्भात स्पष्टता आणणारे राजपत्र सीसीआयएम(केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद)ने नुकतेच जाहीर केले. त्याविरोधात इंडियन मेडिकल कौन्सिलने ११ डिसेंबरला काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. मुंबईमध्ये याचा फारसा परिणाम दिसला नाही. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदातून एमएस पदवी घेणारे डॉक्टर शस्त्रक्रिया करत आहेत. मग इंडियन मेडिकल कौन्सिल आताच का विरोध करत आहेत? असा प्रश्न पडला आहे.

आयएमएने उगाच विरोध करू नये -

आजपर्यंत अनेक शस्त्रक्रियांमध्ये अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद हातात हात घालून काम करत होते. आम्ही आमच्या मर्यादा विसरणार नसून, आम्ही फक्त ५८ शस्त्रक्रियाच करणार आहोत. त्याचा आयुष डॉक्टरने भंग केल्यास त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. आयएमएच्या बंदचा निषेध करण्यासाठी आम्ही मुंबईतील आयुष डॉक्टरांनी एकत्र येत सायन आयुर्वेद रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करत मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केले. आयुष डॉक्टरांनी गुलाबी फिती लावून आयएमएच्या बंदचा निषेध केला, शेठ र.व. आयुर्वेदीय रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. मांगरिश रांगणेकर यांनी सांगितले आहे.

आयएमएचा हा निर्णय म्हणजे आपली एकाधिकारशाही अबाधित राखण्यासाठीचा प्रयत्न -

सीसीआयएमकडून आयुर्वेद डॉक्टरांना फक्त ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या शस्त्रक्रिया वगळता आयुर्वेद डॉक्टरांना अन्य कोणत्याही शस्त्रक्रिया करता येणार नाही आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रिया यापूर्वीही आयुर्वेदच्या डॉक्टरांकडून करण्यात येत होत्या. मात्र, त्यासंदर्भात सीसीआयएमकडून आता अधिक स्पष्टता अधोरेखित करण्यात आली आहे. आयएमएचा हा निर्णय म्हणजे आपली एकाधिकारशाही अबाधित राखण्यासाठीचा प्रयत्न आहे. आयुर्वेदाचे शिक्षण घेणार्‍या डॉक्टरांना आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी अशा दोन्ही पॅथींचे शिक्षण मिळते. त्यामुळे ते अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांपेक्षा अधिक सक्षम असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये आयुष डॉक्टरांचाच सहभाग असतो. येथे अ‍ॅलोपॅथी डॉक्टर का पुढाकार घेत नाही, असा प्रश्नही गुप्ता यांनी उपस्थित केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details