महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ? - aditya Thackeray

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड समजला जातो. सचिन अहिर यांचा अपवाद वगळता या मतदारसंघावर शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. दत्ताजी नलावडे या मतदासंघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत. मराठी मतदारांचा टक्काही या मतदारसंघात जास्त आहे. शिवाय उच्च मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे.

...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ ?

By

Published : Oct 1, 2019, 11:50 AM IST

Updated : Oct 1, 2019, 7:51 PM IST

मुंबई - ठाकरे कुटुंबातील कोणीही आत्तापर्यंत निवडणूक रिंगणात उतरलेले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे, यांच्यापैकी कोणीही निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, ठाकरेंची तिसरी पिढी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्याची स्वत: घोषणा केली. आपण वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केली. मात्र, आदित्य वरळीतूनच का? लढणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.

...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?

हेही वाचा - आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड समजला जातो. सचिन अहिर यांचा अपवाद वगळता या मतदारसंघावर शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. दत्ताजी नलावडे या मतदासंघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत. मराठी मतदारांचा टक्काही या मतदारसंघात जास्त आहे. शिवाय उच्च मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. आदित्य हे या वर्गाच्या जवळ जाऊ शकतात. त्यांचे प्रश्नही समजावून घेऊ शकता. त्यामुळे सध्याच्या स्थितीत आदित्य यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघ हा सुरक्षित मतदारसंघ समजला जात आहे.

हेही वाचा - महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू


वरळी मतदारसंघ हा मुंबईचे हार्ट म्हणून ओळखला जातो. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे लढणार असतील तर त्याचा फायदा त्या मतदारसंघाच्या आजूबाजूला असलेल्या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांनाही होऊ शकतो.

या मतदारसंघात सचिन अहिर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद होती. अहिर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, सचिन अहिर यांना सेनेत खेचून घेण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले. त्यामुळे अहिर यांची ताकदही आदित्य यांच्या मागे उभी राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या सहज विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - शिवसेना ५०-५० फॉर्म्युलावर ठाम; भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत


स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेटवर्क जबरदस्त आहे. शाखांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे वरळी मतदारसंघात आहेत. त्याच बरोबर सहापैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना या मतदारसंघातून तब्बल ४० हजारांचे मताधिक्य होते. त्याच बरोबर भाजपचीही इथे चांगली ताकद आहे. या सर्व गोष्टी आदित्य यांच्यासाठी जमेच्या समजल्या जातात.

सध्याची राजकीय स्थिती पाहता वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्यंसमोर उभा ठाकेल असा एकही तगडा उमेदवार विरोधकांकडे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. मनसेच्या संघटनेतच मरगळ आहे. ते कितपत या निवडणुकीत तग धरतील याबाबत शंका आहे.

आदित्य ठाकरेंचे वास्तव्य वांद्रे-पूर्व विधानसभा मतदारसंघात आहे. ते याच मतदारसंघातून लढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या मतदारसंघात मुस्लीम मतेही निर्णायक आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे टाळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा - भाजपने राणेंना गंडवले का? आता काय करणार राणे?

असा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

– १९६२ – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

– १९६७ – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

– १९७२ – शरद शंकर दीघे ( काँग्रेस)

– १९७८ – प्रल्हाद कृष्णा कुरणे ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी)

– १९८० – शरद शंकर दीघे ( काँग्रेस)

– १९८५ – विनिता दत्ता सामंत ( अपक्ष)

– १९९०, १९९५, १९९९, २००४ – दत्ताजी नलावडे (शिवसेना)

मतदारसंघ पुनर्रचना

– २००९ – सचिन अहिर ( राष्ट्रवादी काँग्रेस)

– २०१४ – सुनील शिंदे ( शिवसेना)

Last Updated : Oct 1, 2019, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details