महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती, एकनाथ शिंदेंसह आदित्य यांचेही नाव चर्चेत - उद्धव ठाकरे

अखेर १८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, आता मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.

कोण होणार सेनेचा नवा मुख्यमंत्री?

By

Published : Nov 11, 2019, 7:15 PM IST

Updated : Nov 11, 2019, 7:21 PM IST

मुंबई - अखेर १८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना सरकार स्थापन करणार आहे. मात्र, आता मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेमध्ये अनेक मोठ्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये आता कोण मुख्यमंत्री पदावर विराजमान होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचा नवीन मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला म्हणजे (१७ नोव्हेंबरला) होण्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. मात्र, अशातच आता मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला आमदारांची पसंती असल्याची माहिती मिळते आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याची पत्रे दिली आहेत. त्यामुळे शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आता राज्यात महाशिवआघाडीचे सरकार अस्तित्वात येणार आहे.

Last Updated : Nov 11, 2019, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details