महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Who Is Gauri Bhide : उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केलेल्या गौरी भिडे कोण? - Who Is Gauri Bhide

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे मालमत्तेची चौकशी (inquire into Uddhav Thackeray assets) एडी सीबीआय लाजपत विभागाच्या वतीने करण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका दादर येथील रहिवासी गौरी भिडे (Gauri Bhide Public Interest Litigation) यांनी दाखल केली आहे. या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा दाखल करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने (Gauri Bhide petition in Mumbai HC) दिले आहे.

Who Is Gauri Bhide
Who Is Gauri Bhide

By

Published : Oct 19, 2022, 9:44 PM IST

मुंबई :पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे मालमत्तेची चौकशी (inquire into Uddhav Thackeray assets) एडी सीबीआय लाजपत विभागाच्या वतीने करण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका दादर येथील रहिवासी गौरी भिडे (Gauri Bhide Public Interest Litigation) यांनी दाखल केली आहे. या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा दाखल करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने (Gauri Bhide petition in Mumbai HC) दिले आहे. मात्र ठाकरेंची मागणी करणाऱ्या नेमके कोण आहे यावरील आढावा... (latest news from Mumbai)

उद्धव ठाकरेंच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह -गौरी भिडे ह्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आयटी विभागात प्रशिक्षण पदावर अंधेरीतील एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत आहे. दैनिक सामनाच्या कार्यालयासमोर गौरी भिडे यांच्या आजोबाची एक प्रिंटिंग प्रेस होती. मात्र कालांतराने ही प्रेस बंद करण्यात आली आहे. गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबीयांचा उत्पन्नाचा स्त्रोत दैनिक सामना आणि मार्मिक आहे या उत्पन्नाच्या स्त्रोतवर एवढी अवाढव्या संपत्ती कशी काय जाऊ शकते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.


गौरी भिडेविषयी-गौरी भिडे यांचे शिक्षण आयटी विभागात झालेले आहे तसेच त्यांनी कायद्याचे देखील शिक्षण घेतलेले आहे कायद्यामध्ये त्यांनी एलएलबी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. मात्र कुठल्याही वकिलाकडे त्यांनी प्रॅक्टिस केली नसल्याने त्यांना वकालत करता येत नाही. ठाकरे कुटुंबाच्या विरोधातील याचिकेमध्ये सुद्धा बाजू मांडणार होत्या. मात्र न्यायालयाने त्यांना सनत मिळाली नसल्याने बाजू मांडण्यास नकार दिला आहे. याच तांत्रिक काही इतर गोष्टीसह याचिका दुरुस्त करण्याचे देखील निर्देश दिले आहे.



याआधी राणेंचा निशाना -दरम्यान या आधीच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंच्या संपत्तीवरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. गौरी भिडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उद्धव ठाकरेंचं उत्पन काय, सामानचं उत्पन्न काय असं विचारण्यात आल्याचे राणे म्हणाले होते. करोनाचा कालावधी हा 2020-21 आणि 2021-22 दरम्यान होता. या कालावधीत महाराष्ट्रातील उद्योगधंदे डबघाईला आले. बेरोजगारी आली. भयावह अशी परिस्थिती आली. जवळजवळ सर्व कंपन्या बुडाल्या. असे असतानाही सामनाची एकूण उलाढाल मात्र तब्बल 42 कोटींची होती असा सवाल राणेंनी उपस्थित केला होता.



मग् एवढी संपत्ती कशी -सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा प्रबोधन प्रकाशनचा छापखाना जिथे आहे त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा राजमुद्रा प्रकाशन हा छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणे, मातोश्री 2 सारखी टोलेजंग इमारती उभी करणे, आलिशान गाड्या, फार्महाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आपलाही हाच व्यवसाय तेवढेच परिश्रम असल्यानं मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवालही या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. वर्तमानपत्रांची छपाई सर्क्युलेशन याचा हिशोब ठेवत त्याच्या दर्जाचे ग्रेडिंग करणारी एसीबी ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो ही संस्था आहे. गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की सामना आणि मार्मिक यांचे एसीबी ऑडिटच झालेलं नाही. तसेच कोरोनाककळातही प्रबोधन प्रकाशनचा 42 लाखांचा टर्नओव्हर आणि 11.5 कोटींचा नफा कसा? त्यामुळे हा पदाचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे करत गोळा केलेला बेहिशोबी पैसा आहे असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details