महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडानंतर कोणाकडे किती आमदार?; वाचा सविस्तर - MLA supported Ajit Pawar after rebellion in NCP

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करत अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी बंडानंतर पक्ष, चिन्हावर दावा ठोकला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार नेमके कोणाकडे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, दोन्ही पवारांकडे सद्यस्थितीत फिफ्टी - फिफ्टी आमदार आहेत. अजित पवारांच्या शपथविधीला गेलेले आमदार तटस्थ भूमिकेत असल्याचे समजते.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis

By

Published : Jul 4, 2023, 5:56 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत भूकंप केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पवारांच्या धक्कादायक निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करणाऱ्यांची हाकलपट्टी केली. तसेच नऊ आमदारांना नोटीस बजावली. विधिमंडळाच्या गटनेते पदावरून ही पवारांची उचलबांगडी केली. मात्र, विधिमंडळात बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने आहेत.

राष्ट्रवदीवर अजित पवारांचा दावा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देखील आमचाच असल्याचा दावा अजित पवारांनी केला. प्रत्यक्षात अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय, पवारांच्या शपथविधीला जे आमदार उपस्थित होते, त्यापैकी शेखर निकम यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. उर्वरित आमदार तटस्थ भूमिकेत असल्याने नेमके कोणाकडे किती संख्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आतापर्यंत 24 आमदार अजित पवारांच्या सोबत : मिळालेल्या माहिती नुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 40 आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे. परंतु, आतापर्यंत 24 आमदार अजित पवारांच्या सोबत आहेत. तर उर्वरित आमदार शरद पवारांच्या सोबत असल्याचे समजते. काहींनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाहीत. त्यामुळे नेमके किती आमदार कोणासोबत आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही.

अजित पवारांचे मनसुबे उधळून लावण्याची हालचाली : आमदारांच्या दोन तृतीयांश आमदार पक्षातून बाहेर पडले तर, त्यांना पक्षांतर बंदी कायदा हा लागू होणार नाही. परतुं, त्यापेक्षा संख्या कमी असल्यास आमदारांची आमदारकी धोक्यात येईल. त्यामुळे अजित पवारांकडून आमदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवारांकडून ही अजित पवारांचे मनसुबे उधळून लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.


मंत्री पदाची शपथ घेतले मंत्री :छगन भुजबळ – येवला, दिलीप वळसे-पाटील – आंबेगाव, हसन मुश्रीफ – कागल, धनंजय मुंडे – परळी, धर्मरावबाबा आत्राम – अहेरी, अनिल पाटील – अमळनेर, संजय बनसोडे – उदगीर, आदिती तटकरे – श्रीवर्धन.


अजित पवारांसोबत असणाऱ्या आमदारांची संभाव्य नावे :सुनील टिंगरे – वडगाव शेरी, निलेश लंके – पारनेर, सुनील शेळके – मावळ, संग्राम जगताप – अहमदनगर शहर, अतुल बेनके – जुन्नर, शेखर निकम – चिपळूण, अशोक पवार – शिरूर, दत्ता भरणे – इंदापूर, सरोज अहिरे – देवळाली, अण्णा बनसोडे – पिंपरी, नरहरी झिरवाळ – दिंडोरी, माणिकराव कोकाटे – सिन्नर, इंद्रनील नाईक – पुसद, दीपक चव्हाण – फलटण, किरण लहामटे – अकोले.

शरद पवारांसोबतचे आमदार :जयंत पाटील – वाळवा, जितेंद्र आव्हाड – मुंब्रा, अनिल देशमुख – काटोल, रोहित पवार – कर्जत-जामखेड, प्राजक्त तनपुरे – राहुरी, संदीप क्षीरसागर – बीड, दौलत दरोडा – शहापूर, नवाब मलिक – अणुशक्तीनगर, मकरंद पाटील – वाई, मानसिंग नाईक – शिराळा, बाळासाहेब पाटील – कराड उत्तर, सुमनताई पाटील – तासगाव, सुनील भुसारा – विक्रमगड, चेतन तुपे – हडपसर,

तटस्थ आमदार :राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा, राजेंद्र कारेमोरे – तुमसर, मनोहर चंद्रिकापुरे – अर्जुनी मोरगाव, चंद्रकांत नवघरे – वसमत, राजेश टोपे – घनसावंगी, नितीन पवार – कळवण, दिलीप बनकर – निफाड, दिलीप मोहिते – खेड आळंदी, आशुतोष काळे – कोपरगाव, प्रकाश सोळंखे – माजलगाव, राजेश पाटील – चंदगड, यशवंत माने – मोहोळ, बबन शिंदे – माढा, बाबासाहेब पाटील – अहमदपूर, बाळासाहेब आजबे – आष्टी.

हेही वाचा -Sharad Pawar Photo Permission : परवानगीशिवाय फोटो वापरू नका; शरद पवारांची थेट तंबी

ABOUT THE AUTHOR

...view details