मुंबई- लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील ६ मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून विशेष व्हीलचेअर टॅक्सीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबविली जात आहे. त्यासाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटूंबियांनी “दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा संपूर्ण पत्ता, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादीतील मतदाराचा अनुक्रमांक” आदी तपशील लघुसंदेशाव्दारे (SMS) किंवा व्हॉट्सएप संदेशाव्दारे भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२८१४२२१ किंवा votedivyang@gmail.com यावर पाठविल्यास वाहन नोंदणी केली जाणार आहे.