महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahul Refinery : माहुलमध्ये गॅस रिफायनरी प्रकल्प; रिफायनरीचा स्थानिकांवर काय परिणाम? - Impact of Refinery at Mahul on the locals

कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनल आहे. मात्र, असाच एक रिफायनरी प्रकल्प मुंबईच्या चेंबूर जवळ असलेले एक छोट गाव माहुल येथे आहे. माहुलमध्ये गॅस रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पामुळे इथल्या स्थानिकांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचा आरोप लोक नेहमीच करत असतात. नेमका या रिफायनरीचा स्थानिकांवर काय परिणाम झालाय? याचा हा रिपोर्ट वाचा.

Refinery News
बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलन

By

Published : May 5, 2023, 10:22 PM IST

रिफायनरीचा स्थानिकांवर काय परिणाम झाला?

मुंबई: बारसु येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा की नाही यासंदर्भात दोन मतप्रवाह दिसतात. इथले स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे आपण सोशल मीडियात पाहिले तर रिफायनरीमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. जगभरात अनेक रिफायनरी प्रकल्प आहेत. त्यामुळे जग नष्ट झाले का? असे प्रश्न विचारणाऱ्या पोस्ट देखील पाहायला मिळतात. मात्र, देशाच्या आर्थिक राजधानीतच चेंबूर पासून अगदी जवळच माहुलगाव येथे रिफायनरी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे नरक यातना भोगत असल्याचे प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.



माहुल मध्ये ऐकून 16 केमिकल 3 रिफायनरी:माहुलमधील रहिवाशांनी काही वर्षांपूर्वीच या प्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. त्यातील मुख्य याचीकाकर्त्या व प्रकल्पग्रस्त अनिता ढोले यांनी सांगितले की, माहुलमध्ये एकूण सोळा केमिकल फॅक्टरी आणि तीन रिफायनरी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे इथल्या हवेत देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. इथल्या पाण्यात देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. या प्रदूषणामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. माहुलमध्ये एकूण 72 इमारती असून जवळपास 50 हजार लोक वस्ती आहे. 2017 पासून इथल्या पुनर्वसनास सुरुवात झाली आहे.



लोक आजारांनी ग्रस्त: अनिता यांनी सांगितले की, आपण जर इथली लोकवस्ती पाहिली तर इथे गुराढोरांप्रमाणे लोकांना आणून टाकले आहे. इथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने लोकांना श्वसनाचे त्रास, त्वचेचे विकार, टीबी यांसारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासलेला आहे. तसेच हे सर्व या माहुल मधील प्रदूषणामुळे झाले आहे.



उच्च न्यायालयाचे निर्णय: माहुल हे ठिकाण राहण्यायोग्य नाही असे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, हरित लवादा यांसारख्या संघटनांचे अहवाल आहेत की, इथल्या रहिवाशांना इतरत्र ठिकाणी स्थलांतरित केले जावे. तातडीने करण्यात यावा. इतके असताना देखील सरकारने आतापर्यंत केवळ 228 घरांचे पुनर्वसन केले. बोरिवली आणि गोराई परिसरात या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, अद्यापही अनेकांचे पुनर्वसन झालेले नाही ही मोठी गंभीर बाब आहे. दिवसेंदिवस इथला मृत्यूचा आकडा वाढतो आहे. लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे माहुल मधील रहिवाशांना तातडीने इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे आहे.अशी प्रतिक्रिया आणि त्या ढोले यांनी दिली आहे.



रिफायनरीमुळे रोजगार मिळाला: माहुलमध्ये देखील दोन मतप्रवाह पाहण्यास मिळाले. अनिता ढोले यांनी माहुल मधील प्रदूषणाची परिस्थिती मांडली. तर राजेंद्र माहुलकर या तिथल्या स्थानिक माजी नगरसेवकांनी माहुलमध्ये प्रकल्पामुळे नेमके काय परिणाम झालेत? काय फायदा झाला? हे सांगितले. राजेंद्र माहुलकर म्हणाले की, साधारण 51 किंवा 52 साली माहुलमध्ये रिफायनरी आली. यांनी रिफायनरीमुळे अनेक माहुलच्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला. अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले. आज आपण पाहिले तर नोकरीसाठी तरुण मुले आपले गाव सोडून शहराच्या ठिकाणी कामाला जातात. मात्र, माहुलमध्ये प्रकल्प आल्याने माहुलच्या तरुणांना रोजगार मिळाला. रिफायनरीमुळे निसर्गावर परिणाम होतो, आंब्यावर परिणाम होतो असे देखील म्हटले जाते. मात्र, माझ्या वडिलांनी येथे आंब्याची बागायती केली. आमची आजही माहोलमध्ये आंब्याची बाग आहे. मात्र, याचा बागेवर कोणताही परिणाम झालेला मला दिसला नाही.अशी प्रतिक्रिया राजेंद्र माहुलकर यांनी दिली.

हेही वाचा: Barsu Village Entry Ban Back अखेर बारसू गावबंदी मागे उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे शासन नरमले

ABOUT THE AUTHOR

...view details