मुंबई :कोकणात राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेनंतर आता बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. हा प्रकल्प खुप मोठा असून हा तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. हा एक महाराष्ट्र शासनाचा आगळावेगळा उपक्रम आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांच्या परिसरात नियोजित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी मोठी कंपनी आहे. केंद्र शासनाचा या आरामको कंपनीबरोबर उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन आणि इंडियन ऑइल या तीन कंपन्यांच्या सहाय्याने हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे.
तेल शुद्धीकरण करणारा मोठा प्रकल्प :तेल शुद्धीकरण क्षेत्रातील आरामको सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी करणारी मोठी कंपनी आहे. हा रिफायनरी प्रकल्प बारसू आणि इतर गावांच्या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवरती प्रस्तावित आहे. थोडक्यात तेल शुद्धीकरण करणारा हा मोठा प्रकल्प आहे. पेट्रोलियम व पेट्रोलियम उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याचा ताण सध्याच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर येत आहे.