महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत ढगाळ वातावरण; आजही पावसाचा अंदाज - तौक्ते वादळ महाराष्ट्र

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच दिवसभर शहरात थंड वारे वाहतील. काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तविली आहे.

मुंबई पाऊस
mumbai rain

By

Published : May 19, 2021, 10:50 AM IST

मुंबई - राज्यात थैमान घालून गुजरातच्या वाटेने राजस्थानात दाखल झालेल्या तौक्ते वादळाचा परिणाम अजूनही शहरात जाणवत आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून हे वातावरण असेच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही विभागाने वर्तविली आहे.

रस्ते आणि रेलवे वाहतूक सुरळीत

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच दिवसभर शहरात थंड वारे वाहतील. काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तविली आहे. याशिवाय आज सायंकाळी 5.32 वाजता समुद्राला भरती येईल. ही भरती 3.7 मीटरची असेल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. दरम्यान शहरातील रस्ते आणि रेलवे वाहतूक सुरळीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details