मुंबई - महाराष्ट्रातही सीएए आणि एनआरसी कायद्यांना मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. हा विरोध पाहता राज्य सरकारनेही या कायद्यांविरोधात ठराव पास केला पाहिजे. याबाबत आपण सरकारला विधानभवनात सांगणार आहोत, अशी माहिती महाविकासआघाडी सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या मित्रपक्ष समाजवादी पार्टी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी दिली आहे.
'आम्ही सरकारला सांगू .. सीएए, एनपीआर, कायद्याविरोधात ठराव करा' - मुंबई
महाराष्ट्रातही सीएए आणि एनआरसी कायद्यांना मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. हा विरोध पाहता राज्य सरकारनेही या कायद्यांविरोधात ठराव पास केला पाहिजे. याबाबत आपण सरकारला विधानभवनात सांगणार आहोत, असे अबु आझमी यांनी म्हटले आहे.
आमदार अबु आजमी समाजवादी पार्टी
हेही वाचा...'दिल्ली हिंसाचाराची जबाबदारी पंतप्रधान मोदींनी घ्यावी'
सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याला देशात ठिकठिकाणी विरोध होत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. गेले अनेक दिवस या कायद्याविरोधात काही ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यामुळे लोकांचा विरोध लक्षात घेता महाराष्ट्र सरकारनेही या कायद्याविरोधात ठराव पास करावा. यासाठी आपण विधानभवनात सरकारला सांगणार आहोत, असे अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.