महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगाच्या पाठीवर सन्मानाने उभे राहण्याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न - शालेय शिक्षण मंत्री

आपल्या राज्यातील मुलं हे राज्याची आणि देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यांना गुणवत्ताधारक शिक्षण मिळाले पाहिजे आणि विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये काही अंतर निर्माण झालेला आहे, ते अंतर दूर व्हावे, असा आमचा प्रयत्न असणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण मंत्री
वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण मंत्री

By

Published : Jan 5, 2020, 10:48 PM IST

Updated : Jan 6, 2020, 9:46 AM IST

मुंबई- दर्जेदार शिक्षण आणि समान शिक्षण देणे ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातली आमची मुलं शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर जातील, त्यावेळी ती सन्मानाने उभे राहिली पाहिजेत. अशा प्रकारचे शिक्षण राज्यात मिळावं; यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आपल्या राज्यातील मुलं हे राज्याची आणि देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यांना गुणवत्ताधारक शिक्षण मिळाले पाहिजे आणि विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये काही अंतर निर्माण झालेला आहे, ते अंतर दूर व्हावे, असा आमचा प्रयत्न असणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.मागील सरकारच्या काळात माझ्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालय होते. त्यावेळी सुद्धा आम्ही शिक्षण हा विषय वेगळाच हाताळला होता. त्यामुळे यावेळीही मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात काही वेगळे करण्याची आम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्यावर निर्णय घेऊ. मुलींची पटसंख्या शाळांमध्ये वाढेल यासाठी वेगवेगळे उपायोजना आम्ही करणार आहोत. जे चांगले निर्णय आत्तापर्यंत झाले असतील ते सुरू ठेवले जातील आणि चुकीचे असतील त्यासाठी आम्ही वेगळा विचार करू शकतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आहेत. त्यामुळे मागच्या काळातील सुद्धा मला तसा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही मुलांना शाळेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. मुलांनी शाळेत गेले पाहिजे. आम्ही त्यासाठी प्राधान्य देणार आहोत. कारण शिक्षण हा त्यांना भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच मुलांना मिळणारे शिक्षण तंत्रज्ञानावर आधारित आणि काळानुरूप बदल झालेले असले पाहिजे. राज्यात शिक्षण घेऊन बाहेर पडलेली मुले जगाच्या पातळीवर कुठेही गेली तर सन्मानाने आणि स्वाभिमानाने उभी राहिले पाहिजेत, असा आमचा प्रयत्न असणार असल्याचा विश्वासही शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी व्यक्त केला.
Last Updated : Jan 6, 2020, 9:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details