नवी मुंबई -कोरोना काळात आलेली आर्थिक डबघाई व त्यात शाळांनी केलेली 'फी'साठी सक्ती यामुळे पालकवर्ग त्रासून गेला आहे. त्यामुळे ज्या शाळांनी नियमभंग केला आहे, त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात येत आहे. या संदर्भात कायद्यांमध्ये काय बदल करता येईल, या संदर्भात समिती गठीत केली असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच ज्या शाळांच्याबाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम केले आहे, असेही गायकवाड यांनी म्हटले.
'ज्या शाळांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यांच्यावर कारवाई' -
शाळा व 'फी' संदर्भात काही तक्रारी असतील, त्या मंत्रिमंडळापर्यंत नेण्याचीदेखील तरतुद केली आहे. 'फी'च्या तक्रारी संदर्भात आम्ही पाठपुरावा करीत आहोत. ज्या-ज्या शाळांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम केले आहे, असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर किती शाळांवर कारवाई करण्यात आली. हे मात्र गायकवाड यांनी सांगितले नाही.
'विभागीय स्तरावर डीएफआरसी कमिटीची स्थापना' -