महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईला पाणी पुरावठा करणारा 'विहार' तलावही ओव्हरफ्लो - Bhatasa

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

विहार तलावा मुंबई

By

Published : Jul 31, 2019, 11:58 PM IST

Updated : Aug 1, 2019, 12:04 AM IST


मुंबई- गेल्या काही दिवसात तलाव क्षेत्रात पाऊस झाल्याने तलावांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी, तानसा, मोडकसागर नंतर विहार हा चौथा तलाव भरला आहे. सातही तलावांत सध्या 85.68 टक्के पाणीसाठा जमा आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील 150 दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते.

मुंबईला 31 ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावात एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सातही तलावांत मिळून 12 लाख 40 हजार 122 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला पुढील पावसाळा सुरू होई पर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव 12 जुलै रोजी, तानसा तलाव 25 जुलैला, 26 जुलैला मोडक सागर तलाव भरून वाहू लागला होता.

बुधवारी 31 जुलै रोजी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सध्या सुरू असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही पाण्याने भरून मुंबईकरांच्या वर्षभराची तहान भागेल, अशी अपेक्षा पालिकेच्या जलविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Last Updated : Aug 1, 2019, 12:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details