मुंबई - सध्या मुंबईत अधून मधून पाऊस पडत असला तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे शहराला पाणीपुरावठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे. आज १८ ऑगस्टला धरणात ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे. यामुळे लवकरच मुंबईत सुरू असलेली २० टक्के पाणीकपात रद्द केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ८२ टक्के पाणीसाठा; पाणी कपात होणार रद्द - तुळशी धरण
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. आज १८ ऑगस्टला धरणात ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे. यामुळे लवकरच मुंबईत सुरू असलेली २० टक्के पाणीकपात रद्द केली जाईल अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.