मुंबई:भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा (Warning of heat wave in some parts of the state) जारी केला आहे. तर मुंबई हवामान विभागाचे प्रमुख डाॅ. जयंता सरकार यांनी म्हणले आहे की, पालघर, मुंबई आणि ठाणे या उत्तर कोकणातील प्रदेशांसाठी आम्ही तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Heatwave In Maharashtra : मुंबईसह राज्यातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा - भारतीय हवामान विभाग
महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह मुंबई परिसरात (Mumbai area including Vidarbha, Khandesh, Marathwada) गेल्या काही दिवसांपासून पारा वाढताना पहायला मिळत आहे. यातच हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र उष्णतेची लाट (Warning of heat wave in some parts of the state) येऊ शकते, असा इशारा दिला आहे.
उष्णतेची लाट
मुंबईमध्ये तापमान पारा 39 अंश सेल्सियसवर पर्यंत वाढत जाईल आणि पुढचे दोन दिवस ते वाढलेलेच राहिल असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये सध्या तापमान वाढले आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये अनेक ठिकाणी 38 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे. त्या भागात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. त्याचा परिणामी या भागात उष्णतेची तिव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाणे दिला आहे.