मुंबई - मालाड मालवणी प्लॉट क्रमांक 45 येथील न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरात मंगळवारी एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र यात घराखाली असलेल्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
मालवणीत घराची भिंत कोसळली - भिंत कोसळली
मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास मालाड मालवणी प्लॉट क्रमांक 45 येथील न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरातील एका घराची भिंत कोसळली.
भिंत कोसळली
मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, म्हाडाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई पश्चिम उपनगरात गेल्या दोन आठवड्यातील ही चौथी घटना आहे.