महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपत्कालीन परिस्थितीला प्राधान्याने सामोरे जाणार, नवनियुक्त राज्यमंत्री विश्वजीत कदम - लोकशाही

वर्षभरात झालेले नुकसानाची भरपाई करण्यासाठी मंत्री म्हणून निश्चितपणे कार्य करेल, असा विश्वास नवनियुक्त मंत्री विश्वजीत कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

राज्यमंत्री विश्वजीत कदम
राज्यमंत्री विश्वजीत कदम

By

Published : Dec 30, 2019, 5:26 PM IST

मुंबई- लोकशाही संवर्धित करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे देशातील अशांतता आणि आपत्कालीन परिस्थितीच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात झालेले नुकसानाची भरपाई करण्यासाठी मंत्री म्हणून निश्चितपणे कार्य करेल, असा विश्वास नवनियुक्त मंत्री विश्वजीत कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

बोलताना नवनियुक्त राज्यमंत्री विश्वजीत कदम

मंत्रीपदाबद्दल काँग्रेसचे त्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी झोकून काम करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना असतील, शेतकऱ्यांसाठी आवश्यक सिंचन असेल किंवा गतवर्षी झालेली अतिवृष्टी आणि निसर्गाच्या संकटातून आपत्कालीन मदत करण्यासाठी मी प्राधान्याने मंत्रिमंडळामध्ये काम करेल, असे विश्वजीत कदम म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details