महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : मुंबईत मुजोर फेरीवाल्यांचा पोलिसांवर हल्ला, पोलिसी खाक्या दाखवत घेतले ताब्यात

महापालिकेचे ६ कर्मचारी आणि जुहू पोलीस ठाण्याचे १६ अधिकारी यांनी ही कारवाई केली. दरम्यान घटनास्थळी असलेले पोलीस उपनिरीक्षक मानजरे यांच्यावर फेरीवाल्यांच्या जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांना अटक केली.

फेरीवाल्यांना पोलिसी खाक्या दाखवताना पोलीस

By

Published : Apr 5, 2019, 8:18 AM IST

Updated : Apr 5, 2019, 1:13 PM IST

मुंबई - शहरातील जुहू गल्लीतील रस्त्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

मुंबई महापालिका आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली होती. महापालिकेचे ६ कर्मचारी आणि जुहू पोलीस ठाण्याचे १६ अधिकारी यांनी ही कारवाई केली. दरम्यान घटनास्थळी असलेले पोलीस उपनिरीक्षक मानजरे यांच्यावर फेरीवाल्यांच्या जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांना अटक केली.

जुहू परिसरातील फेरीवाल्यांमुळे पोलीस प्रशासनाला नेहमीच अडचणी येत असतात. जुलै २०१६ मध्ये याच ठिकाणी असलेल्या वाफा मेडीकलमध्ये आग लागली होती. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाला पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यामुळे आपत्कालीन मदत वेळेत पोहचली नव्हती. त्यामुळे ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Last Updated : Apr 5, 2019, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details