महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ्यावर टीका केली होती, ते आज कुठे आहेत?

महाविकास आघाडीच्या खातेवाटपाबाबत बोलताना तावडे म्हणाले, नाराज आमदारांना माझे सांगणे आहे, जर ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला नसता तर आज नाराज आमदारांना चांगली खाती मिळाली असती. पण आज सायडिंगचे खाते घेऊन चांगली कामं करून दाखवा यासाठी शुभेच्छा असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयू च्या हल्ल्याची तुलना 26/11 च्या घटनेशी केली, त्यावरून बोलताना त्यांनी ठाकरेंवर टीका केली. ढवळ्या शेजारी बसवला पवळ्या, अशी गत उद्धव ठाकरेंची झाली असून बाळासाहेबांचं हिंदुत्व दिवसेंदिवस पातळ होत चालले असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

By

Published : Jan 6, 2020, 5:19 PM IST

Updated : Jan 6, 2020, 6:14 PM IST

विनोद तावडे - माजी शिक्षणमंत्री
विनोद तावडे - माजी शिक्षणमंत्री

मुंबई- उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे ज्ञानेश्वरी विद्यापीठातून पदवीधारक आहेत. त्यावरून आता माजी मंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्यावेळी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ्यावर टीका केली होती, ते आज कुठे आहेत? असा सवाल तावडेंनी उपस्थित केला आहे. माझ्या गरिबीची थट्टा करू नका असे, मी त्यावेळेस सांगत होतो, मात्र आज उदय सामंत हे सलग दुसरे शिक्षण मंत्री त्याच ज्ञानेश्वरी विध्यापीठातून पास झालेत याचा अभिमान आहे. तसेच त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचेही तावडे म्हणाले. यावेळी तावडे यांनी इतर काही मुद्यावरही आपले मत व्यक्त केले.

विनोद तावडे - माजी शिक्षणमंत्री
महाविकास आघाडीच्या खातेवाटपाबाबत बोलताना तावडे म्हणाले, नाराज आमदारांना माझे सांगणे आहे, जर ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला नसता तर आज नाराज आमदारांना चांगली खाती मिळाली असती. पण आज सायडिंगचे खाते घेऊन चांगली कामं करून दाखवा यासाठी शुभेच्छा असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयू च्या हल्ल्याची तुलना 26/11 च्या घटनेशी केली त्यावरून बोलताना त्यांनी ठाकरेंवर टीका केली. ढवळ्या शेजारी बसवला पवळ्या अशी गत उद्धव ठाकरेंची झाली असून बाळासाहेबांचं हिंदुत्व दिवसेंदिवस पातळ होत चालले असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याच्या चर्चेवर बोलताना तावडे म्हणाले, अजून इतर राज्यांच्या निवडणुका बाकी असताना अशी वक्तव्य करून फोकस स्वतःकडे ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ज्यांना त्यांची चाकरी करायची असेल त्यांनो खुशाल करावी. त्यावेळेस जे आकडे असतील त्यावेळी ठरेल कोण राष्ट्रपती होणार असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

जेएनयू हल्ला प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे

जवाहरलाल विद्यापीठात झालेल्या हिसाचारावर बोलताना तावडे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचे आंदोलन केले जेकी 10 रुपयांचे शुल्क 600 रुपये केली तर राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढत होते. त्या विद्यार्थ्याचे साबरमती होस्टेलच्या बाजूच्या टपरीत 10 हजारांचे चहाचे बिल होते. त्याचे 3 हजार सिगारेटचे बिल होते. अशा लोकांनी या प्रतिष्ठित विद्यापीठाचा तमाशा केला असल्याचा आरोपही तावडे यांनी यावेळी केला. या हल्ला प्रकरणाची चौकशी करून खरे दोषी कोण आहेत, ते समोर आणले पाहिजे असेही तावडे म्हणाले.

Last Updated : Jan 6, 2020, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details