महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपला धक्का, विनायक बाजपेयी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - विनायक बाजपेयी

मागील ३५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले व लातूर विभागाची जबाबदारी सांभाळत असलेल्या विनायक बाजपेयी व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विनायक बाजपेयी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By

Published : Mar 24, 2019, 4:35 PM IST

मुंबई- मागील ३५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले व लातूर विभागाची जबाबदारी सांभाळत असलेल्या विनायक बाजपेयी व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टीतील विचार कुठे तरी संपले आहेत. काँग्रेसमुक्त भारत अशी भाजपने हाक दिली होती, मात्र भाजपमध्ये हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढली आहे. अली बाबा आणि चाळीस चोर सारखा विषय भाजपमध्ये झाला आहे. त्याला कंटाळून भाजपच्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी विनायक बाजपेयी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

विनायक बाजपेयी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढे ते म्हणाले, की काँग्रेसची विचारसरणी पटली. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भविष्यात काँग्रेसची सत्ता यावी, अशी माझी इच्छा आहे. ३५ वर्षे भाजपमध्ये काम करत असताना कोणतीही अपेक्षा बाळगली नाही. संघटनेमध्ये राहून काम करणे हे माझे काम आहे. पक्ष देईल ते काम करायची माझी तयारी आहे, असेही बाजपेयी यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details