मुंबई - दिलीप गांधी यांच्याशी माझे आधीपासूनचे संबध असून त्यांनी बोलावले होते म्हणून त्यांना भेटलो. आमची मुलाखत राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. काँग्रेस निवडणूक कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये होत असून राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत उपस्थित आहेत. यावेळी विखे पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
राजकारणात असल्यामुळे दिलीप गांधींशी जुने संबंध आहेत. यामुळे मी त्यांना भेटलो, असे त्यांनी सांगितले. पक्षाने आपल्याला स्टार प्रचारक केले आहे. यामुळे पक्षाचा आदेशानूसार मी प्रचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अहमदनगरमधील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी युतीचे उमेदवार असलेले डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत विचारलेला असता, कार्यकर्त्यांच्या निर्णयावर मी काय भाष्य करणार, असे ते म्हणत त्यांनी एकप्रकारे पाठिंबाच दर्शविला. संग्राम जगताप अर्ज भरायला जातील. त्यावेळी मी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी नाराज नाही; पक्ष सांगेल तिथे प्रचार करणार - विखे पाटील - vikhe patil
काँग्रेस निवडणूक कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये होत असून राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत उपस्थित होते.
संग्राम जगतापांचा अर्ज भरायला जाणार नाही
महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित होते. तसेच, पत्रकार परिषदेआधी झालेल्या बैठकीतसुध्दा विखे पाटील अनुपस्थित होते. यावरून विखे पाटील यांची नाराजी कायम असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी भाजपने उमेदवारी नाकारलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. मी नाराज नसून आघाडीच्याबैठकीबद्दल मला वेळेवर माहिती देण्यात आली. त्यादिवशी मी दुसऱ्या कामात अडकल्याने संयुक्त पत्रकार परिषदेला अनुउपस्थित होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.