महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राधाकृष्ण विखेंसह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १२ एप्रिलला अहमदनगरला सभा घेणार आहेत. या सभेच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर १७ एप्रिलला अकलुजलाही मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. सभेचा मुहुर्त साधत राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील हे सुध्दा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

By

Published : Apr 10, 2019, 11:36 PM IST

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील

मुंबई -राज्यात उद्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत असताना काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्तावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे चर्चिले जात आहे. यामुळे ऐन प्रचारात महाघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १२ एप्रिलला अहमदनगरला सभा घेणार आहेत. या सभेच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर १७ एप्रिलला अकलुजलाही मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. सभेचा मुहुर्त साधत राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील हे सुध्दा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दोन्ही दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे ८ आमदार भाजप प्रवेशासाठी उत्सुक असल्याचे समजते. पण आताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यास आमदारकी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या यशावर या काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश अवलंबून असल्याचेही सांगितले जात आहे. विखे-पाटील यांचे पुत्र सुजय भाजपच्या तिकिटावर नगरमधून निवडणूक लढवत आहेत, तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगरमधून सुजय विखे पाटील हे भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी काँग्रेसकडे केली आहे. मात्र, याबाबत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे या तक्रारीबाबत विचारणा केली असता त्यांनी सावध पवित्रा घेत अशा प्रकारची तक्रार आली नसल्याचा दावा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details