महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शीला दीक्षित यांच्या निधनाने काँग्रेसने एक कुशल संघटक गमावला - विजय वडेट्टीवार

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता व कुशल संघटक गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

By

Published : Jul 20, 2019, 5:59 PM IST

विजय वडेट्टीवार

मुंबई- दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता व कुशल संघटक गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शीला दीक्षित यांनी पक्षसंघटनेला बळकटी देण्याचे काम केले. त्या उत्तम संघटक होत्या. काँग्रेसला जनाधार मिळवून देण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००८ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविला होता. १९९८ ते २०१३ अशी १५ वर्षे त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपद भुषविले होते. दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदीची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत दिल्लीचा कायापालट झाला. रिंगरूट, मेट्रो ट्रेन, रस्त्यांचे रुंदीकरण, अशी विविध विकास कामे त्यांनी केली. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली आहे, अशी भावना व्यक्त करून दीक्षीत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details