मुंबई : शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर देखीलशिवसेना अद्यापही तेवढ्याच ताकतीने उभी आहे. याच काळात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर असल्याने शिवसेनेबाबत एक पाहायला (View special report on Shiv Sena Branch System) मिळते. ती म्हणजे - शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपली पण, शिवसेना मुंबईतून संपू शकत नाही. आता हे बोलणारे जरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असले तरी यामागे कारण आहे - ते शिवसेनेची पक्ष संघटना, त्याची मांडणी आणि या मांडणीच्या मुळाशी असलेल्या शिवसेनेच्या शाखा. या शिवसेनेच्या शाखांमुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही संपू शकत नाही, असे म्हटले जाते. काय आहे शिवसेनेची शाखा सिस्टीम ? कसं चालतं या शाखांमध्ये काम ? याचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा स्पेशल (Special Report on Shiv Sena) रिपोर्ट.
मुंबईचे तरुण आणि तत्कालीन परिस्थिती :शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या तो काळ म्हणजे तीन पिढ्यांपूर्वीचा काळ. म्हणजेच गिरणी कामगारांचा काळ. त्यावेळी मुंबई गिरणी कामगारांची चलती होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मुंबईतील गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी अनेकजण मुंबईत आले होते. या लोकांना मुंबईने देखील आपलंसं करून घेतले होतं. माथाडी कामगार, कष्टाची काम करणारा आणि गावाकडून मुंबईत स्थलांतरित झालेला या कामगारांचे जसे प्रश्न जटिल होते. तसेच किंवा त्याहूनही अधिक त्यांच्या वयात आलेला मुलांचे प्रश्न अधिक गंभीर होते. ही मुलं दिवसभर नाक्यावर वेळ घालवायचे अपुऱ्या जागेमुळे दिवसभर घरात जाण्याची सोय नसायची रात्री आल्यावर वडिलांचं बोलणं ऐकून घ्यायला लागायचं, पण दुसरीकडे तरुण पोरांच्या अंगात रग होती. या तरुणांना काहीतरी करायचे होतं. गणपतीचे दहा दिवस झाले की, ही पोरं रिकामी (Shiv Sena Branch System in Mumbai) असायची.
कशा सुरू झाल्या शिवसेनेच्या शाखा ?या रिकाम्या पणाला तत्कालीन मुंबईमध्ये कुठकुठल्या जागा होत्या ? तर, कामगारांचे कम्युनिस्ट अड्डे होते. राष्ट्रसेवा दलाच्या शाखा होत्या. सोबतच संघाच्या देखील शाखा होत्या. पण, तरुण पोरांच्या मनातली ही रग या तिन्ही संघटनाला हेरता आली नाही. प्रत्येक पिढीचा आपल्या वडिलांसोबत संघर्ष असतोच त्यामुळे कम्युनिस्ट अड्डे वजा झाले. राष्ट्रसेवा दलाच्या शाखा चांगलं जमलं असण्याच्या नादात वजा होत गेल्या. तर, संघाच्या शाखांना या पोरांमधली ही रग ओळखताच आली नाही. बाळासाहेबांनी सुरुवातीच्या काळात 80% समाजकारणाचा नारा दिला तो याच कारणाने. शिवसेनेची स्थापना झाली आणि त्याच काळाचे कट्टे जमू लागले. नाक्यावर, चाळीच्या जिन्याखाली, कोपऱ्यावर हे तरुण गोळा होत. त्या तरुणांनी शाखांना प्राथमिक असं स्वरूप (Shiv Sena Branch System) दिलं.
शिवसेनेची शाखा सिस्टीम :मार्मिकमधून आलेला कृती कार्यक्रम प्रत्यक्ष राबवण्याचं कसब या तरुणांमध्ये होतं. आजचे भुजबळ असोत की राणे असो, हे सगळे नेते महाराष्ट्राला या शाखांच्या माध्यमातून पुढे आले. मात्र, या शाखा कधी सुरू झाल्या ? आणि ही सिस्टीम कोणी वर्कआउट केली? याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. पण, याचे उत्तर शाखांना बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांना शाखांची गरज होती यातूनच हा प्रश्न निकाला लागतो. वरतून खाली किंवा खालतून वरती जाणीवपूर्वक उभारलेली सिस्टीम म्हणजे शिवसेनेच्या शाखा, असं कधीच नव्हतं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सेनेचे तब्बल 42 नगरसेवक निवडून आले होते. यानंतर उभारत गेलेली सिस्टीम म्हणजे शाखा असे म्हणता (View special report) येईल.
शिवसेना आणि मुंबईकरांचे भावनिक नातं :शाळेतली भांडण, नळाचं पाणी, तुंबलेली गटार, बाप आणि पोराचा वाद, मागे लागलेला दवाखाना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक सिस्टीम आवश्यक होती. शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या विजयानंतर ठीक ठिकाणी असणाऱ्या नाक्यांवर छोटी मोठी बांधकाम करून शाखा सुरू करण्यात आल्या. अनेक नेत्यांनी आपल्या दुकानाच्या समोर, घराच्या पुढे बाकडी टाकून ही सिस्टीम उभा केली. मात्र, या सगळ्यानंतर उपनगरांमध्ये विखुरलेल्या मराठी माणसालाही आपल्याकडे सुद्धा अशा समस्या ऐकून घेणाऱ्या आणि मार्ग काढणारा शाखा असाव्यात असं वाटू लागल. दुसरीकडे सेनेचे निवडून आलेले नगरसेवक शाखांवर बसू लागले. तर, जे प्रयत्न होते ते शाखांवर येऊन तिथल्या सत्ताधारी नगरसेवकांना पर्याय देऊ लागले. त्यामुळे पुढच्या काही काळातच प्रभागवार शिवसेनेच्या शाखांची सुरुवात होत गेली.
शाखांनी काय केलं ?शाखांनी मराठी माणसांना कोणता कृती कार्यक्रम दिला ? तर, शाखांनी समस्या सोडवणाऱ्या तरुणांची फौज सुद्धा उभारली. ही फौज विभागातल्या दहावीत नंबर आलेल्या मुलांचा कौतुक सोहळा देखील आयोजित करेल, आणि साम दाम दंड भेद वापरून एखाद्याचा कार्यक्रम सुद्धा करत असे. यातूनच आपल्या मागे आपली भावकी आहे. हा गाव सोडलेल्या मराठी माणसाला आधार देखील मिळाला.