महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेला एकोप्याने पुढे कसे जावू हाच आमचा महत्वाचा विषय - अजित पवार - sharad pawar

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार

By

Published : May 29, 2019, 11:09 AM IST

मुंबई- देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद मोदी यांना निवडून दिले आहे. त्यामुळे देशात भाजपचे लोक अधिक निवडून आले. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेल्या निकालाला स्वीकारायचे असते. आम्ही तो निकाल स्वीकारला आहे. येत्या काळात एकाप्याने विधानसभेला कसे सामोरे जाऊ शकतो, हाच विषय आमच्यासाठी महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज दिली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या निवडणुकीला जाण्यासाठी समविचारी पक्षांनी कशा प्रकारे लाईन ऑफ अॅक्शन ठरवायची हे महत्वाचे आहे. राज्यात दुष्काळाचे वातावरण असून त्यातून जनतेला सावरण्यासाठी पुढे आले पाहिजे, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी जनाधार कसा वाढेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्यानेच आज वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचा अपवाद सोडल्यास इतर सर्व समविचारी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन चर्चेला सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात एकोप्याने विधानसभेला कसे सामोरे जाऊ शकतो, हाच विषय आमच्यासाठी महत्वाचा असल्याचे पवार म्हणाले. तसेच मावळ लोकसभा मतदार संघात आपल्या मुलाला जनतेनी दिलेला कौल आपल्याला मान्य असून त्याच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी असल्याचेही पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details