महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vice President Jagdeep Dhankhad : तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण झालं पाहिजे - उपराष्ट्रपती जगदीप धनखड - भारताचे उपराष्ट्रपती

Vice President Jagdeep Dhankhad : भारताचे उपराष्ट्रपती यांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांची आज खुला संवाद साधला. यावेळेस त्यांनी जगातील तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, त्यात झालेला विकास आणि तो जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाच्या 'लोकशाहीकरणा'वर भर देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केलं.

Vice President Jagdeep Dhankhad
उपराष्ट्रपती जगदीप धनखड

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 11:20 AM IST

मुंबई : आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज खुला संवाद साधला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं जग एका बदलाच्या नव्या वळणावर येऊन ठेपलं असल्याचं तसेच तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण करण्यासाठी आयआयटीसारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी केलं. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल देखील उपस्थित होते. आयआयटी मुंबईच्या वतीनं आयोजित केलेल्या तंत्रज्ञानासंबंधी कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. 6 नोव्हेंबर रोजी आयआयटी मुंबईमध्ये हा कार्यक्रम पार पडला.




तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणावर भर द्यावा: मानव समाज तंत्रज्ञानामुळेच प्रगत झालेला आहे. तो भौतिक, सामाजिक, आर्थिक सर्वच अंगानं प्रगत होत आलेला आहे. संपूर्ण भारतीय समाजाला पुढे नेण्यासाठी आयआयटी सारख्या उच्च दर्जाच्या संस्थांनी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याकरता पुढाकार घेण्याची गरज असल्याचं देखील उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं.

महिला सक्षमीकरण आवश्यक : महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचं महत्त्व जपलं पाहिजे. त्यांना कष्टमुक्त करणाऱ्या आणि त्यांचं जीवन अधिक सुखकर करणाऱ्या स्वच्छ भारत मिशन, उज्ज्वला योजना आणि हर घर जल योजनेमुळं कष्टकरी महिलांच्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे. तसेच महिला आरक्षणासाठीच विधेयक हे देखील मानवी विकासाचं महत्त्वाचं पाऊल असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.


कृत्रिम बुद्धिमत्ताकडं देखील लक्ष द्या :उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, 6जी, क्रिप्टोग्राफी, सायबर सुरक्षा आणि हरित हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसेच जगामध्ये युद्धाचं स्वरूप बदलत असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा होणारा वापर याचं महत्त्व देखील आजच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
भ्रष्टाचार हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. भ्रष्टाचार सामान्य माणसाच्या विकासात अडथळा आणतो आणि लोकांना हताश करतो; असे उपराष्ट्रपती म्हणाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस, प्रा. एस. सुदर्शन, उपसंचालक(एआयए), आयआयटी मुंबई , प्रा. के.व्ही. के. राव, उपसंचालक (एफईए), आयआयटीमुंबई, विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Onion Price Increased : ऐन दिवाळीत कांद्यानं आणलं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी; हॉटेलमधूनही कांदा गायब
  2. BMC Dead Body Bag Scam : किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, महापालिका अतिरिक्त आयुक्तांची आज होणार चौकशी
  3. Shivaji Maharaj Statue : भारत पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले . . .

ABOUT THE AUTHOR

...view details