मुंबई :भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणांमध्ये जो हिंसाचार झाला. त्यामध्ये मनोर भिडे आणि एकबोटे सह इतर आरोपी आहेत. तसेच तक्रारदारांकडून इतर 16 जणांवर आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या 16 आरोपी मध्ये प्रख्यात लेखक प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळाला आहे तर आंध्र प्रदेशातील कवी लेखक प्राध्यापक वरा वरा राव यांना देखील वैद्यकीय कारणावर तर डॉक्टर सुधा भारद्वाज यांना देखील जामीन मिळालेला आहे.
आता वर्नोन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा या दोघांना देखील जामीन मंजूर झाला आहे. आज हे दोन्ही तळोजा तुरुंगातून बाहेर आले आहेत. भीमा कोरेगाव विजय स्तंभाला 200 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आंबेडकरी आणि ओबीसी, बहुजन जनता त्या ठिकाणी जमली होती. आणि त्याच वेळी मनोहर भिडे आणि एकबोटे यांनी काही जातीवादी तरुणांना भडकवले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आणि दंगा झाला असा आरोप आहे.
त्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देखील अटक करा असे निर्देश दिले होते. तर पुण्यामध्ये एल्गार परिषद जी भरवली गेली होती. परिषद भरवली त्यामुळे हिंसाचार झाला असा आरोप आहे. त्यात 16 आरोपी आहेत. त्यापैकी अरुण परेरा आणि वर्णन गोंसल्व्हीस हे पण आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनेकदा प्रकरण सुनावणीला आले असता त्यांचा जामीन फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी धाव घेतली.
28 जुलै 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने यांना जामीन मंजूर केला होता. 2018 मध्ये भीमा कोरेगाव एल्गार परिषद झाल्यानंतर सहा महिन्यांनी या दोन्ही व्यक्तींना आरोपी बनवले गेले. आणि त्यानंतर त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा 1967 आणि 2002 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. या संबंधात मुंबई सत्र न्यायालयामध्ये नियमित सुनावणी सुरू असून जामीनासाठीचे अर्ज उच्च न्यायालयात दाखल झाले होते.
परंतु या आधीच्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयामधून जामीन मिळाल्यामुळे यांना देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये जावे लागले .आणि सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. भीमा कोरेगाव एल्गार परिषदे दरम्यान जी जाळपोळ दंगल झाली त्यामध्ये मनोहर भिडे आणि एकबोटे यांच्यावर देखील आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या प्रकाराबाबत आयोगाकडे नियमित दररोज सुनावणी सुरू आहे.या संदर्भात नियमित साक्ष नोंदवण्याचे काम आयोग करत आहे.