महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्षा राऊत एक दिवसआधीच 'ईडी' कार्यालयात हजर - panjab maharashtra bank scam news

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावत त्यांना ५ जानेवारी रोजी 'ईडी' कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आज वर्षा राऊत अचानक ईडी कार्यालयात हजर राहणार आहे.

varsha-raut-suddenly-appeared-in-ed-office
आज वर्षा राऊत अचानक ईडी कार्यालयात हजर

By

Published : Jan 4, 2021, 3:34 PM IST

Updated : Jan 4, 2021, 3:43 PM IST

मुंबई - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून तपास केला जात असताना यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. त्यानुसार 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालय मध्ये चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, त्या एक दिवसआधी अचानक ईडी कार्यालयामध्ये हजर झाल्या आहेत.

काय आहे प्रकरण -

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेकडून 95 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यातील जवळपास 1 कोटी 6 लाख रुपये प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते. या एकूण रकमेपैकी 55 लाख रुपये हे दोन टप्प्यात वर्षा राऊत यांना बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. 2010 मध्ये वर्षा राऊत यांना 50 लाख, तर 2011 मध्ये 5 लाख रुपये माधुरी यांच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या पैशाचा वापर दादर पूर्व येथील एक फ्लॅट विकत घेण्यासाठी करण्यात आल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात वर्षा राऊत यांची चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा - औरंगाबादनंतर आता पुण्याचे नाव बदलण्याची मागणी; पुणे होणार 'जिजापूर'?

Last Updated : Jan 4, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details