मुंबईVande Bharat Express In Marathwada :'वंदे भारत ट्रेन' ही गेल्या दोन वर्षांत भारतात बहुचर्चित अशी ट्रेन झालेली आहे. तासाला 180 किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावते. लांबच्या स्टेशनला गतीने गाठण्याचं काम या ट्रेनच्या माध्यमातून केलं जातं. देशामध्ये मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. (Vande Bharagt Inauguration in Marathwada) त्यामुळे दिल्ली ते मुंबई हा प्रवास विमाना ऐवजी ट्रेनने करणाऱ्यांची संख्या अधिक वाढेल आणि कमी वेळात गाडी नियोजित स्थळी पोहोचेल. तसंच आता मुंबई ते जालना अशी देखील वंदे भारत ट्रेन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. (PM Narendra Modi)
आठवड्यातून एकदा धावणार ट्रेन :मराठवाडा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांच्या उद्घाटनानंतर आठवड्याला एकवेळा ही जालना ते मुंबई, मुंबई ते जालना या पद्धतीने धावणार आहे. त्यानंतर पुढेही नियमित आठवड्यातील अधिकाधिक वेळा या रेल्वे मार्गावर धावणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी देखील रेल्वे मंत्रालयाकडून आणि मराठवाडा विभागातील रेल्वे मंडळाकडून करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालय दिल्ली कोच विभागाकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे.
येत्या वर्षात 400 वंदे भारत ट्रेन :वंदे भारत ट्रेन देशभरात विविध मार्गांवर चालवली जावी, अशी सरकारची इच्छा आहे. 'मेक इन इंडिया' या संकल्पनेतून या वंदे भारत ट्रेन तयार केल्या जात आहेत. त्या ट्रेनचे डबे बनवण्याचे काम सुरू आहे. भारत सरकारने प्रोटोटाईप इंटिग्रल कोच फॅक्टरी (IFC) यांना 86 वंदे भारत ट्रेन बनवण्याचे कंत्राट दिलेले आहे. त्यापैकी नऊ स्लीपर बाकीच्या स्लीपर वर्जन गाड्या असणार आहेत.
मध्य रेल्वेचे काय म्हणणे आहे -या संदर्भात मुंबई मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांना विचारले असता त्यांना या संदर्भात कोणतीही कल्पना नाही. अधिकृत माहिती जशी मिळेल तशी आम्ही सांगू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण या संदर्भातील सूचनापत्र थेट दिल्लीहून कार्यकारी संचालक रेल्वे कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांनी जारी केलेलं आहे. त्यामुळे मुंबई मंडळाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचले नाही.
मराठवाड्याला मिळणार पहिली वंदे भारत एक्सप्रेस, पंतप्रधानांच्या हस्ते 30 डिसेंबरला होणार उद्घाटन - मराठवाड्याला वंदे भारत एक्सप्रेस
Vande Bharat Express In Marathwada : मराठवाड्यासाठी पहिली 'वंदे भारत एक्सप्रेस' (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनाने सुरू होणार आहे. 'मेक इन इंडिया' संकल्पनेतून वंदे भारत ट्रेनची निर्मिती भारताच्या रेल्वे विभागाने केलेली आहे. 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या जालना ते मुंबई मराठवाड्याच्या 'वंदे भारत' ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. (Mumbai to Marathwada Train)
वंदे भारत एक्सप्रेस
Published : Dec 23, 2023, 5:30 PM IST
|Updated : Dec 23, 2023, 6:28 PM IST
Last Updated : Dec 23, 2023, 6:28 PM IST