मुंबई- घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर परिसरात वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून पूर्व द्रुतगती महामार्ग थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत रास्तारोको थांबवला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर, दुसरीकडे सायन ट्रोम्बे महामार्गावरही रास्तारोकोचा प्रयत्न करण्यात आला आहे.
घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर 'वंचित'कडून रास्तारोकोचा प्रयत्न हेही वाचा -'झेंड्यापेक्षा विचार महत्वाचा, राज ठाकरेंची भाजपविरोधी धार कमी होणार नाही'
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आज(शुक्रवार) वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत मात्र याचे पडसाद सकाळी दिसून येत आहेत. घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावरील रमाबाई नगर येथील वंचितचे काही कार्यकर्ते सकाळी महामार्गावर येत घोषणा देत रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न केला.
या दम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला आहे. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक मंदावली आहे.