मुंबई - लोकल रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर करावा. मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुलभ व सुरक्षित प्रवासाची मागणी करत वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात निर्दशने करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणीसाठी निवेदन देताना
मोदी सरकार 1 मध्ये गेल्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नाही. या अगोदर रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात होता. दोन दिवसांपूर्वी मोदी सरकार 2 मधे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात मुंबईतील लोकल रेल्वे विकासासाठी निश्चित रक्कमेची तरतुद केली आहे, असा उल्लेख केलेला नाही.
चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे निर्दशने
मुंबईच्या लोकलने दिवसभरात सुमारे 75 लाखांच्या वर प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक दिवशी लोकल प्रवासात जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते. मुंबई शहराची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा रोज या ना त्या तांत्रिक कारणाने विस्कळीत होत असते. मुंबई लोकल व यातील सेवांची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढविण्यात यावी, जेणेकरूण लोकलचा प्रवास सुलभ होणार. मुंबई लोकलसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असेल तर लोकल रेल्वेचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत.
देशातील सर्व लोकल रेल्वे सेवापैकी केवळ मुंबई लोकल सेवा ही सरकारला नफा करून देते. पैसा जमा करून केंद्र सरकार इतरत्र खर्च करून लोकल रेल्वेचा विकास करीत नाही. नविन लोकल नाहीत, पावसाच्या पाण्याने लोकल सेवा बाधित होते. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प असल्यास त्यात स्वतंत्र तरतुदी केल्या जातील यासाठी आज वंचित बहुजन आघाडी तर्फे चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाच्या मागणीसाठी निर्देशने करण्यात आली.